2021 च्या पहिल्या सहामाहीत कोरोना प्रतिबंधक लस येण्याची शक्यता – डब्ल्यूएचओ वैज्ञानिक

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 15 लाखांच्या पुढे गेला आहे. हजारो जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशांमध्ये या व्हायरलवरील प्रतिबंधक लस शोधण्याचे काम सुरू आहे. आता डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिकांनी सौम्या स्वामीनाथन यांनी 2021 च्या पहिल्या सहामाहीत मोठ्या प्रमाणावर कोरोना लस येण्याची शक्यता वर्तवली आहे.

एनटीटिव्हीशी बोलताना सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, काही कंपन्यांनी आतापर्यंत दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल पुर्ण केले आहे. आता त्या पुढील टप्प्याची तयारी करत आहेत. फेज 3 ट्रायलची देखील सुरुवात झाली आहे. हा महत्त्वपुर्ण टप्पा आहे. याचे परिणाम बघितल्याशिवाय काहीही सांगणे अवघड आहे. मात्र आम्हाला हे यशस्वी होण्याची आशा आहे.

रॅपिड अँटिजन टेस्टच्या मुद्यावर त्या म्हणाल्या की, याचे अनेक ठिकाणी चुकीचे परिणाम देखील समोर आले आहेत, मात्र अनेक देशांनी याचा वापर केला आहे. आता संक्रमित व्यक्तींची जी संख्या पाहण्यास मिळत आहे, त्याच्या तुलनेत वास्तविक संख्या खूप अधिक आहे.

सरकारने दिल्ली आणि मुंबईत अधिक चाचण्या कराव्यात, असेही त्या म्हणाल्या.

(टिप : वरील बाबी संशोधन अथवा अभ्यासतून सिद्ध झालेल्या असून त्या केवळ माहिती म्हणून आम्ही आमच्या वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्याचा दावा माझा पेपर यातून करत नाही.)