सीमोउल्लंघन न करता 600 किमी पर्यंत पाक-चीनमध्ये होत्याचे नव्हते करुन ठेवणार राफेल

बहुप्रतिक्षित राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी आज अंबाला येथे लँड करणार आहे. एअरफोर्स स्टेशनवर यासाठी पुर्ण तयारी करण्यात आली आहे. 3700 किमी मारक क्षमता असलेले 5 राफेल विमान आल्याने हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. अण्वस्त्रांसह अनेक शस्त्रे याद्वारे लाँच करणे शक्य आहे. शस्त्रांच्या स्टोरेजसाठी 6 महिन्यांची गॅरेंटी देखील असेल. याशिवाय राफेलमध्ये रडार सिस्टमवर एक टन कॅमेऱ्याची सुविधा आहे. ही सुविधा या विमानाला इतर विमानांपेक्षा वेगळे बनवते.

Image Credited – Amarujala

रडार सिस्टमवर एक टन कॅमेऱ्याची सुविधा असल्याने याचा निशाणा अचूक असेल. कॅमेरा एवढा संवेदनशील आहे की जमिनीवर कोणत्याही छोट्या केंद्राला याने पाहणे शक्य आहे. राफेल विमान जवळपास 60 हजार फूट उंचीवरून उड्डाण घेऊ शकते. यामुळे भारतीय हवाई दलाच्या आधुनिकिकरणाला गती मिळेल.

Image Credited – Amarujala

राफेल लढाऊ विमानामुळे हवाई दल अधिक मजबूत तर होईलच शिवाय एअर विजिलेंस देखील अधिक सक्षम होईल. राफेलची रेंज 3700 किमी सांगितली जात आहे. मात्र हवेतच रिफ्यूल करता येत असल्याने, याची रेंज वाढवता येऊ शकते. चीन आणि पाकिस्तानच्या कारवायांना उत्तर देण्यासाठी राफेल भारतीय हवाई दलातील सर्वात खतरनाक शस्त्र आहे. राफेल एअर स्पेस सीमा न ओलांडता पाकिस्तान-चीनच्या 600 किमी आत टार्गेटला पुर्णपणे उद्धवस्त करू शकते.

Image Credited – Amarujala

राफेलची आणखी एक खास गोष्ट म्हणजे विमान उड्डाण घेतल्यानंतर 100 किमीच्या कक्षेत 40 टार्गेटवर एकसोबत निशाणा साधू शकते. हे मल्टी डायरेक्शनल रडारमुळे शक्य आहे. टू सिटर राफेल विमानामध्ये पहिला पायलट शत्रूचे टार्गेट लोकेट करेल व दुसरा पायलट लोकेट करण्यात आलेल्या टार्गेटला सिग्नल मिळाल्यानंतर त्याला नष्ट करण्यासाठी विमानातील शस्त्रांना ऑपरेट करेल.  राफेल शत्रूच्या विमानाचे रडार देखील जाम करू शकते. राफेल विमानाच्या कॉकपिटमध्ये असे सिस्टम डिझाईन करण्यात आले आहे, ज्यामुळे युद्धाच्यावेळी पायलटला पुर्ण लक्ष उड्डाणासोबत शत्रूच्या टार्गेटला लक्ष करण्यात देता येईल.