… म्हणून 5 वर्षांच्या चिमुकल्याने चालवली तब्बल 3200 किमी सायकल

कोरोना व्हायरस महामारी संकटाच्या काळात लोक एकमेकांची मदत करत आहेत. अनेकजण वेगवेगळ्या माध्यमातून लोकांची मदत करत आहे. काही रनर घरातच धावत आहेत, तर काही लहान मुले शेकडो किमी सायकल चालवून गरजूंसाठी निधी जमा करत आहेत. अशीच एक माहिती समोर आली असून, 5 वर्षांच्या मुलाने तब्बल 3200 किमी सायकल चालवली आहे. हे केवळ त्याने कोरोना मदत निधीसाठी केले. सायकलिंगच्या माध्यमातून या चिमुकल्याने 3.7 लाख रुपये फंड जमा केला.

या मुलाचे नाव अनीश्वर कुंचला आहे. 27 मे रोजी त्याने एक अभियान सुरू केले होते. या अभियानाला त्याने ‘Little pedallers Aneesh and his friends’ असे नाव दिले होते. त्याच्यासह 60 अन्य मित्रांनी देखील यात भाग घेतला होता.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, जगभरात या चिमुकल्याच्या अभियानाला डोनेशन मिळाले. भारत आणि अमेरिकेतील नागरिकांनी देखील डोनेशन दिले. या आधी अनीश्वरने क्रिकेट चँलेंज देखील होते.

अनीश्वरचे आई-वडील आंध्र प्रदेश येथील आहे. सध्या ते इंग्लंडमध्ये राहतात. आंध्र प्रदेश आणि तेंलगानाचे ब्रिटिश उपउच्चायुक्त अँड्रयू फ्लेमिंग यांनी देखील अनीशच्या कामाला जगासमोर शेअर केले आहे.