चीन वाढवत आहे भारताची डोकेदुखी; नेपाळमध्ये सुरू केले 30 कोटी डॉलर्सच्या रेल्वे प्रकल्पाचे काम

भारतासोबत सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आता चीनने नेपाळमध्ये 30 कोटी डॉलर्सच्या रेल्वे योजनेवर काम सुरू केले आहे. महत्त्वाची असलेली ही रेल्वे लाइन ल्हासा ते काठमांडूकडे जाईल आणि नंतर ती भारत-नेपाळ सीमेजवळील लुंबिनीलाही जोडली जाईल. चीनच्या मीडियाने या रेल्व प्रोजेक्टचे सर्वेक्षण करतानाचे फोटो जारी केले आहे.

Image Credited – Aajtak

भारतसोबत तणावाची स्थिती असताना चीन प्रकल्पांद्वारे नेपाळमध्ये आपली पकड मजबूत करत आहे. चीन-नेपाळमध्ये रेल्वे लाईन प्रकल्प 2008 मध्ये निश्चित झाला होता. मात्र तेव्हापासून यात विशेष प्रगती झालेली नाही. मात्र नेपाळ-भारताच्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर चीन कॉरिडोरवर वेगाने काम करत आहे. ही महत्त्वकांक्षी योजना वर्ष 2025 पर्यंत पुर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

Image Credited – Aajtak

चीनने 2008 मध्ये या प्रकल्पाचा पाया रचला होता. रेल्वे कॉरिडोर ल्हासा ते शिगास्ते जोडले जाईल आणि त्यानंतर नेपाळ सीमेजवळील केरंगपर्यंत वाढविण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला होता. शेवटच्या टप्प्यात ही रेल्वे लाईन काठमांडू आणि लुंबिनी येथे आणली जाईल. या प्रकल्पाचा खर्च आता 30 कोटी डॉलर्सवर पोहचला आहे. या प्रकल्पात अनेक सुरंग आणि पूल बनवले जाणार आहेत, त्यामुळे हे जटील काम आहे.

नेपाळमधील चीनचा प्रभाव रोखण्यासाठी भारताने देखील एक रेल्वे कॉरिडोरचा प्रस्ताव ठेवला आहे. भारत आणि नेपाळमध्ये 6 रेल्वे लाईन बनविण्याची योजना आहे.