अति घाई संकटात नेई; लवकर लस बनविण्याची नादात चीनने प्रमुख अधिकाऱ्यालाच टोचली कोरोना लस

सर्वात प्रथम कोरोना प्रतिबंधक लस बनविण्यासाठी अनेक देशातील वैज्ञानिक दिवस-रात्र काम करत आहेत. अमेरिका, ब्रिटन आणि चीनमध्ये लसीचे तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू झाले आहे. यात आता चीनने ट्रायल दरम्यान आपल्या देशातील सेंट्रल फॉर डिजीज कंट्रोलच्या (सीडीसी) प्रमुखांना देखील कोरोना प्रतिबंधक लस टोचली आहे.

चीनच्या सीडीसीचे प्रमुख गाओ फू यांनी स्वतःच माहिती दिली की, त्यांनी कोरोनाच्या लसीचे एक इंजेक्शन लावून घेतले आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल यशस्वी झाल्याशिवाय कोणीही लस सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाही. ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या लोकांसाठी लस असुरक्षित देखील ठरू शकते.

अनेक देशांमध्ये स्वतःहून पुढे येणाऱ्या लोकांवर लसीचे ट्रायल केले जाते. मात्र एका रिपोर्टनुसार, चीनमध्ये काही सरकारी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना लस टोचून घेणे अनिवार्य केले आहे. सीडीसीच्या प्रमुखांना लस टोचून घेतल्याचा दावा केला, जेणेकरून लोकांना देखील यासाठी तयार करता येईल. गाओ फू यांनी सांगितले की, त्यांना आशा आहे लस काम करेल.

दरम्यान, चीन, अमेरिका आणि ब्रिटन या देशांमध्ये सर्वात प्रथम लस बनविण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. जो देश सर्वात प्रथम लस बनवेल, त्या देशाला नक्कीच मोठा फायदा होईल. जगभरात जवळपास 24 लसींवर काम सुरू असून, त्यातील 8 एकट्या चीनमध्ये आहेत.