दहावीचा निकाल जाहीर, दहावीच्या निकालातही कोकणाने मारली बाजी


मुंबई : जवळपास 17 लाख विद्यार्थी आणि त्यांचे पालक ज्या दहावीच्या निकालाची प्रतिक्षा करत होते, तो महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, अखेर आता ही उत्सुकता संपली आहे. विद्यार्थी हा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ पाहू शकतात. राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली आहे. यंदा 3.1 टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला आहे. तर बारावीच्या निकालाप्रमाणेच कोकण विभागाने दहावीच्या निकालातही यंदा बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

विभागनिहाय टक्केवारी

 • पुणे – 97.34 टक्के
 • नागपूर – 93.84 टक्के
 • औरंगाबाद – 92 टक्के
 • मुंबई – 96.72 टक्के
 • कोल्हापूर – 97.64 टक्के
 • अमरावती – 95.14 टक्के
 • नाशिक – 93.73 टक्के
 • लातूर – 93.09 टक्के
 • कोकण – 98.77 टक्के

निकाल कुठे आणि कसा पाहाल? – दरम्यान विद्यार्थ्यांसाठी एक वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येईल. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकता.

या वेबसाईटवर निकाल पाहता येणार?

 • www.mahresult.nic.in
 • www.maharashtraeducation.com