एन-95 मास्क सुरक्षित नाही, वापरा सुती कापडाने बनलेले मास्क

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. अनेकजण एन-95 मास्कला प्राधान्य देतात. मात्र वॉल्व असलेला एन-95 मास्क सुरक्षित नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आधीच सांगितले आहे. वॉल्व असलेले एन-95 मास्क संसर्ग रोखण्यास सक्षम नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. डॉक्टरांनी देखील हा मास्क वापरू नये असे सांगितले आहे. घरीच बनवलेल्या सूती मास्कला प्राधान्य द्यावे असे त्यांचे म्हणणे आहे.

अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, एन-95 मास्क संसर्ग रोखण्यास सक्षम नाही. जर एखाद्या व्यक्तीने असा मास्क घातला असल्यास त्याच्या श्वासातील व्हायरस फिल्टर म्हणजेच रेस्पिरेटरद्वारे बाहेर येऊ शकतात. त्यामुळे वॉल्व असलेले एन-95 मास्क वापरणे चुकीचे आहे.

Image Credited – The Economic Times

संसर्गापासून वाचण्यासाठी घरी बनवलेले मास्क अधिक फायदेशीर आहेत. चेहरा झाकण्यासाठी सुती कापडाचा वापरता करता येतो. याद्वारे मास्क बनविण्याआधी कापड 5 मिनिटे गरम पाण्यात धुवावे. मास्क घेताना तुमच्या आकाराचा आहे याची काळजी घ्यावी. अनेकदा लोक असे मास्क वापरतात, ज्यातून हवा आत-बाहेर येत जात असते. त्याचा काहीही फायदा होत नाही. बाजारात ट्रिपल लेअर मास्क, सिक्ल लेअर मास्क  आणि एन-95 मास्क उपलब्ध आहेत. या मास्कची किंमत 100 ते 500 रुपयांपर्यंत आहे.

Image Credited – The Economic Times

ऑनलाईन देखील मास्कची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. कॉटन, खादी आणि लिनन फॅब्रिकमध्ये हे मास्क उपलब्ध आहेत. दरम्यान, मास्क न लावता अजिबात घराबाहेर पडू नका. मास्क वापरल्यानंतर धुवा. वृद्धांनी शक्य असल्यास घरात देखील मास्क वापरावा.  

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही