स्टुअर्ट ब्रॉडची धमाकेदार कामगिरी, कसोटीत 500 विकेट्स घेणारा ठरला 7वा खेळाडू

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅनचेस्टर टेस्टच्या पाचव्या व अखेरच्या दिवशी मोठी कामगिरी केली आहे. स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज ठरला आहे. एवढेच नाही तर स्टुअर्ट ब्रॉड अशी कामगिरी करणारा इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासातील केवळ दुसरा गोलंदाज आहे. स्टुअर्ट ब्रॉडच्या आधी जेम्स अँडरसनने इंग्लंडसाठी खेळताना 500 विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता.

स्टुअर्ट ब्रॉडने मॅनचेस्टर टेस्टच्या शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजच्या क्रेग ब्रेथवेटला आउट करत 500 विकेट्स क्लबमध्ये एंट्री केली. 140 टेस्ट सामन्यांमध्ये ब्रॉडने ही कामगिरी केली आहे.

स्टुअर्ट ब्रॉडच्या आधी मुथैया मुरलीधरन (श्रीलंका) – 800 विकेट्स, शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) – 708 विकेट्स, अनिल कुंबळे (भारत) – 619 विकेट्स, जेम्स अँडरसन (इंग्लंड) – 589 विकेट्स, ग्लेन मेकग्रा (ऑस्ट्रेलिया) – 563 विकेट्स आणि कोर्टनी वॉल्श (वेस्टइंडीज) – 519 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.