दिलासादायक बातमी; 3 महिन्यात पहिल्यांदाच मुंबईत आढळले सर्वात कमी कोरोना रुग्ण

देशासह राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यातच मुंबईतून एक दिलासायक माहिती समोर आली आहे. शहरात मागील तीन महिन्यात एका दिवसात पहिल्यांदाच सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत. केवळ 700 रुग्ण सोमवारी मुंबईत आढळले आहेत. मे नंतर एकादिवसात आढळलेला हा सर्वात कमी आकडा आहे.

चाचणी देखील मोठ्या प्रमाणात होत असून, मुंबईत एका दिवसात सर्वाधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. सोमवारी शहरात 8,776 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. याशिवाय मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर 68 दिवस झाला आहे.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. तीन महिन्यातील हा मोठा दिलासा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोबतच मास्क घाली घेऊ नका, केवळ नंबर खाली आणा, असेही म्हटले.