मोरारी बापूंचे राम मंदिराच्या निर्मितीसाठी 5 कोटी रुपयांचे दान

राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्येमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. 5 ऑगस्टला भूमिपूजन पार पडणार असून, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, लाल कृष्ण आडवाणी यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत.

आता राम मंदिराच्या निर्मितासाठी प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापू यांनी 5 कोटी रुपये दान करणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय विश्व हिंदू परिषदेने सांगितले की राम मंदिरासाठी देशभरातील हिंदूंकडून निधी जमा केला जाईल.

 भावनगरच्या तलगाजरडा येथे डिजिटल माध्यमातून रामकथा सांगणारे संत मोरारी बापू यांनी मंदिराच्या निर्मितासाठ 5 कोटी देणार असल्याचे सांगितले. मोरारी बापू म्हणाले की, सर्वात प्रथम राम जन्मभूमीसाठी 5 कोटी रुपये दान केले जातील. जे प्रभू श्री रामाच्या चरणी एक तुळशीपात्राच्या स्वरूपात असतील.

याशिवाय त्यांनी माहिती दिली की, चित्रकूट धाम तलगाजरडा येथील त्यांच्या आश्रमाकडून देखील 5 लाख रुपये देण्यात येतील. विश्व हिंदू परिषदेने देखील माहिती दिली की, राम मंदिराच्या निर्मितीसाठी प्रत्येक गाव आणि शहरात दानपात्र घेऊन जाणार आहे व लोकांकडे निधी मागितला जाईल.