महिंद्रा बोलेरोने जेसीबीपासून वाचवले युवकाचे प्राण, पहा थरारक व्हिडीओ

एका बाईक दुर्घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ज्याप्रकारे एक व्यक्ती आणि बाईक दुर्घटनाग्रस्त होण्यापासून वाचले आहेत, ते पाहून कोणीही हैराण होईल.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक जेसीबी नियंत्रणाच्या बाहेर जाते आणि रस्त्याच्या कडेला बाईकला टेकून उभे असलेल्या व्यक्तीला चिरडणार, तेवढ्यात महिंद्रा बोलेरो जेसीबीला येऊन धडकते. यामुळे युवकाचे प्राण वाचतात. व्हिडीओ पाहून एखाद्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे, असे वाटते मात्र हे असे घडले आहे.

या व्हिडीओला उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील ट्विटरवर शेअर केले. त्यांनी लिहिले की, असे वाटत आहे जणून बोलेरो एक जिवित वस्तू बनली आहे आणि त्याचे एकमेव मिशन दुचाकीस्वाराला वाचवणे हे होते.

बोलेरो आपल्या मजबूतीसाठी ओळखली जाते. हा व्हिडीओ बघून बोलेरो किती मजबूत एसयूव्ही आहे यावर तुमचा देखील विश्वास बसेल. या घटनेत युवकाला कोणतेही इजा झाली नसून, जेसीबी आणि बोलेरो चालकाला थोडी दुखापत झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.