इस्त्रायल पंतप्रधानांच्या मुलाने ट्विट केला देवी दुर्गाचा आक्षेपार्ह फोटो, मागावी लागली माफी

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू मोठा मुलगा यैरला हिंदूची माफी मागावी लागली आहे. अपमानजनक ट्विट केल्याने यैरला माफी मागावी लागली आहे. त्याने ट्विटरवर हिंदू देवी दुर्गाचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये देवा दुर्गाच्या चेहऱ्याच्या जागी लिएट बेन एरीचा चेहरा होता. एरी हे बेंजामिन नेतान्याहू यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात फिर्यादी आहे.

29 वर्षीय यैर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. अनेकदा आपल्या वडिलांच्या धोरणांना पाठिंबा देतो. त्याने देवी दुर्गाचा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी यावर आक्षेप नोंदवला. अखेर त्याने हे ट्विट डिलीट करत माफी मागितली.

त्याने लिहिले की, मी एका पेजवरू मीम ट्विट केले होते. जे इस्त्रायलमधील लोकप्रिय व्यक्तींची टीका करणारे होते. मला हे माहित नव्हते की हे मीम हिंदूच्या आस्थेसंबंधित एक फोटो देखील आहे. माझ्या भारतीय मित्रांची प्रतिक्रिया आल्यानंतर याची माहिती मिळाली. मला समजताच मी ट्विट डिलिट केले आहे. मी माफी मागतो.