पाकिस्तानमध्ये गुरुद्वाराला मशिदीमध्ये बदलण्याचा प्रयत्न, भारताने दर्शवला विरोध

पाकिस्तानच्या लाहौरमधील भाई तारू सिंगजी यांच्या ‘शहीद स्थान’ गुरुद्वाला मशिद असल्याचे सांगणे आणि त्याला मशिदीमध्ये  बदलण्याच्या प्रयत्नांना भारताने विरोध केला असून, पाकिस्तान उच्चायोगासमोर कठोर शब्दात आक्षेप नोंदवला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, लाहौरच्या नौलखा बाजार येथील शहीद स्थान गुरुद्वारेबाबत पाकिस्तानने कथितरित्या दावा केला आहे की ही मशिद शहीद गंजचा भाग आहे आणि याला मशिदीमध्ये बदलण्याचा प्रयत्न केला गेला.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले की, गुरुद्वारा शहिदी स्थान एक ऐतिहासिक गुरुद्वारा असून, येथे भाई तारूजी यांनी वर्ष 1745 मध्ये बलिदान दिले होते. या स्थानाला शीख समुदाय पवित्र मानतो. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक शीख समुदायाच्या न्यायासाठी आवाज उठत आहे. भारत या प्रकरणात पाकिस्तानकडे त्वरित चौकशी करण्याची मागणी करतो.

श्रीवास्तव म्हणाले, पाकिस्तानला हे देखील सांगितले आहे की अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांचे रक्षण,  हितसंबंध तसेच त्यांचे धार्मिक हक्क आणि सांस्कृतिक वारसा यांचे संरक्षण करावे.