गुगलने वाढवला वर्क फ्रॉम होमचा कालावधी

कोरोना व्हायरस महामारीच्या संकटात अनेक कंपन्या आपल्या कामगारांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देत आहेत. टेक्नोलॉजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगलने देखील कर्मचाऱ्यांच्या हितासाठी घरून काम करण्याचा कालावधी वाढवला आहे. आता कंपनीचे अधिकांश कर्मचारी 30 जून 2021 पर्यंत घरून काम करू शकतील.

आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले, ‘कर्मचार्‍यांना त्यांच्या आगामी योजना निश्चित करण्यात मदत करण्यासाठी आम्ही स्वैच्छिक वर्क फ्रॉम होम पर्याय 30 जून 2021 पर्यंत वाढवित आहोत. हे त्या पदांसाठी आहे, ज्यात ऑफिसमधून काम करण्याची आवश्यकता नाही.

याआधी गुगलने आपल्या कर्मचाऱ्यांना डिसेंबर 2020 पर्यंत वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली होती. मात्र आता हा कालावधी वाढवला आहे. यामुळे गुगलच्या 2 लाख कर्मचारी आणि कॉन्ट्रॅक्टर्ससाठी वर्क फ्रॉम होमचा पर्याय असेल.

गुगलच्या या निर्णयानंतर इतर कंपन्या देखील आपल्या कर्मचाऱ्यांचा घरून काम करण्याचा कालावधी वाढवू शकतात. कारण कर्मचारी कार्यालयात परतल्यावर संसर्गाचा धोका वाढतो.