फ्लिपकार्टची जबरदस्त सेवा, अवघ्या 90 मिनिटात मिळणार डिलिव्हरी

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आपली नवीन 90 मिनिटांची डिलिव्हरी सर्व्हिस सुरू केली आहे. कंपनीने हायपरलोकल सर्व्हिस म्हणून ‘फ्लिपकार्ट क्विक’ची (Flipkart Quick) घोषणा केली आहे. या सर्व्हिस अंतर्गत कंपनी ग्रोसरी आणि घरगुती वस्तूंची डिलिव्हरी करणार आहे. ही सेवा सुरूवातीला बंगळुरूमध्ये मिळणार असून, त्यानंतर हळूहळू देशातील इतर शहरांमध्ये मिळेल.

कंपनीने सांगितले की, फ्लिपकार्ट क्विकवर ग्राहकांना सकाळी 6 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत डिलिव्हरीची सुविधा मिळेल. ग्राहकांना या सुविधेसाठी केवळ 29 रुपयांची फी द्यावी लागेल.

फ्लिपकार्टनुसार, फ्लिपकार्ट क्विक सेवा केवळ ग्रोसरी आणि घरगुती वस्तूंसाठीच मर्यादित नसेल, तर यावर मोबाईल फोन आणि स्टेशनी संबंधीत ऑर्डर देखील घेतले जातील. या सेवेद्वारे कंपनी ग्रोफर्स आणि मिल्कबास्केट तसेच अ‍ॅमेझॉनला टक्कर देत आहे.