धक्कादायक : ब्रिटनमध्ये मांजरीला झाली कोरोनाची लागण

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. अनेक देशांमध्ये प्राण्यांना देखील या आजाराची लागण होत असल्याचे समोर आले होते. आता ब्रिटनमध्ये मांजरीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्रिटनमध्ये एखाद्या प्राण्याला कोरोनाची लागण झाल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. अधिकाऱ्यांनी मात्र स्पष्ट केले मांजरीपासून इतरांना कोरोनाची लागण झाल्याचे पुरावे अद्याप मिळालेले नाहीत.

लंडनचे सरे येथे ही मांजर कोरोना पॉजिटिव्ह आढळली आहे. या मांजरीच्या मालकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यापासून मांजरीला संसर्ग झाल्याचे संकेत मिळतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पर्यावरण मंत्रालयाने सांगितले की, मांजरीला कोणताही धोका नाही. प्राण्याला कोरोनाची लागण झाल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. या प्राण्यामुळे संसर्ग पुढे पसरल्याची पुष्टी झालेली नाही.

मांजरीचा आधी एका खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टराकडून उपचार करण्यात आला होता. ज्यात मांजरीला फेलिन हर्पीस व्हायरस होता. मात्र नंतर कोव्हिड-19 चाचणी केल्यानंतर, रिपोर्ट पॉजिटिव्ह आला.