कोरोनामुळे गेली नोकरी, 600 ठिकाणी अर्ज केल्यानंतरही महिलेला मिळाले नाही काम

कोरोना व्हायरस महामारीमुळे जगभरात लाखो लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. नोकरी गेल्यानंतर दुसरी नोकरी देखील लवकर मिळत नाही. सोशल मीडियावर अशाच एका नोकरी गेलेल्या महिलेची गोष्ट व्हायरल होत आहे. या महिलेने मार्चपासून ते आतापर्यंत 600 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला. मात्र अद्याप नोकरी मिळाली नाही.

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे 3-4 महिने अनेक कंपन्या-फॅक्ट्री बंद होत्या. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे राहणाऱ्या सिनीड सिंपकिंस या लीगल असिस्टेंट म्हणून काम करत असे. मात्र लॉकडाऊनमध्ये त्यांची मार्चमध्ये नोकरी गेली. नोकरी गेल्यानंतर त्यांनी शेकडो ठिकाणी अर्ज केला, मात्र त्यांना कोठेही नोकरी मिळाली नाही.

याविषयी सिंपकिंस म्हणाल्या की, हे खूपच अवघड आहे. माझा आत्मविश्वास कमी करणारे आहे. मी स्वतःला अनेकदा अडचणीत पाहते. मला काम करायचे आहे, मात्र हे शक्य नाही. कारण माझ्याकडे नोकरीच नाही. सिंपकिस यांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न देखील अपुर्ण राहत राहिले आहे.

दरम्यान, अर्थशास्त्रज्ञ ब्रेंडन रिने म्हणाले की, कोरोना महामारी दरम्यान नोकरी गेल्याने युवकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मात्र आता हा ट्रेंड बदलत असून, अधिक वय असणाऱ्यांच्या देखील अडचणी वाढल्या आहेत.