लहान मुलांसाठी बुगाटीने आणली मिनी इलेक्ट्रिक कार, एखाद्या बंगल्या एवढी आहे किंमत

लग्झरी कार बनवणारी कंपनी बुगाटीने लंडनच्या लिटिल कार कंपनीसोबत मिळून लहान मुलांसाठी मिनी इलेक्ट्रिक बुगाटी तयार केली आहे. कंपनीने या गाडीला बुगाटी बेबी II असे नाव दिले आहे. या पिटुकल्या गाडीची किंमत तब्बल 35 हजार डॉलर्स (जवळपास 26 लाख रुपये) आहे. जगभरात याचे केवळ 500 मॉडेल्स विकले जाणार आहेत. या गाडीला 1926 मध्ये बनवलेल्या बुगाटी बेबीचे मॉडर्न मॉडेल देखील म्हटले जात आहे.

Image Credited – Bhaskar

1926 मध्ये एट्टोर बुगाटीने आपल्या सर्वात लहान मुलासाठी बुगाटी टाईप 35 रेसिंग कारचे हुबेहुब दिसणारे हाफ साइज मॉडेल तयार केले होते. नवीन बुगाटी बेबी II जुन्या गाडीपेक्षा थोडी मोठी आहे. या नवीन बुगाटी बेबीला 14 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाची मुले देखील चालवू शकतात.

Image Credited – Inceptive Mind

कंपनीने या इलेक्ट्रिक मॉडेलला 3 व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. बेस मॉडेलमध्ये दोन ड्रायव्हिंग मोड आहेत. नोव्हिस मोडमध्ये कारचा टॉप स्पीड ताशी 19 किमी, तर एक्सपर्ट मोडमध्ये ताशी 48 किमी आहे. याच्या Vitesse आणि Pur Sang या व्हेरिएंटचा स्पीड अधिक आहे. या व्हेरिएंटची किंमत $50000 (जवळपास 37.37 लाख रुपये) आणि $68000 (जवळपास 50 लाख रुपये) आहे.

Image Credited – Autodevot

टॉप व्हेरिएंटचा स्पीड ताशी 67 किमीपर्यंत आहे. कंपनीचा दावा आहे की गाडी अवघ्या 6 सेंकदात ताशी 0 ते 100 किमीचा वेग पकडू शकते. एकदा फूल चार्ज केल्यावर गाडी 50 किमी अंतर पार करू शकते.