सॅमसंगचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच, 6,000 रुपयांपेक्षा कमी किंमत - Majha Paper

सॅमसंगचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच, 6,000 रुपयांपेक्षा कमी किंमत

चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मागणीने भारतात चीनी मोबाईल कंपन्यांना मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक फायदा सॅमसंगचा झाला आहे. सॅमसंगसाठी ही सुवर्णसंधी आहे. या संधीचा फायदा घेत कंपनीने भारतातील आपला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. याची किंमत 6 हजार रुपयांपेक्षाही कमी आहे.

Image Credited – Amarujala

सॅमसंगने भारतात आपला नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी एम01 कोर सादर केला आहे. हा कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. गॅलेक्सी एम01 या वर्षी लाँच झालेल्या एम सीरिजचा तिसरा फोन आहे.

Image Credited – Amarujala

गॅलेक्सी एम01 कोरमध्ये 5.3 इंच एचडी डिस्प्ले मिळेल. हा फोन निळ्या, काळ्या आणि लाल रंगातील व्हेरिएंटमध्ये मिळेल. फोनमध्ये मीडियाटेकचे क्वॉडकोर 6739 प्रोसेसर देण्यात आलेले आहे. फोनमध्ये अँड्राईड गो मिळेल.

Image Credited – Amarujala

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात 8 मेगापिक्सल रियर कॅमेरा देण्यात आलेला आहे. ज्यासोबत फ्लॅश लाईट देखील आहे. याशिवा फोनमध्ये सेल्फीसाठी 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4जी सपोर्ट आणि 3000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की यात 11 तास बॅकअप मिळेल. या फोनच्या 1 जीबी रॅम + 16 जीबी व्हेरिएंटची किंमत 5,499 रुपये आहे. तर 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,499 रुपये आहे. 29 जुलैपासून फोनची विक्री सुरू होईल.