व्हिडीओ : राफेल विमानांची पहिली तुकडी भारताच्या दिशेने रवाना - Majha Paper

व्हिडीओ : राफेल विमानांची पहिली तुकडी भारताच्या दिशेने रवाना

चीनसोबतच्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आता भारताची ताकद वाढणार आहे. आज 5 राफेल विमानांच्या तुकडीने फ्रान्सवरून भारताच्या दिशेने उड्डाण घेतले आहे. ही तुकडी बुधवारी हरियाणाच्या अंबाला येथील एअर फोर्स स्टेशनवर लँड करेल.

राफेल लढाऊ विमान पुढील महिन्यात हवाई दलात सहभागी होईल. राफेल 10 तासांच्या प्रवासानंतर यूएईमधील फ्रांसच्या एअरबेसवर लँड करेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अंबालासाठी उड्डाण घेईल. फ्रान्स ते यूएई दरम्यानच्या प्रवासात हवेत इंधन भरण्यासाठी राफेलसोबत दोन रिफ्यूलर देखील येतील.

राफेल भारतीय हवाई दलाच्या 17व्या स्क्वाड्रन गोल्डन एरोजचा हिस्सा बनेल. भारतीय हवाई दलाच्या पायलटने राफेल विमानांच्या उड्डाणाचे प्रशिक्षण घेतले आहे. तेच पायलट ही विमाने भारतात आणतील. औपचारिकरित्या ऑगस्टमध्ये विमाने हवाई दलात सहभागी होतील.

फ्रान्समधील भारतीय राजदूताने उड्डाणापुर्वी पायलट्सची भेट घेत, त्यांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. विमानाच्या उड्डाणाचा एक व्हिडीओ देखील त्यांनी शेअर केला आहे.