‘शक्तीसाठी भुकेल्या लोकांनो लाज बाळगा’, राजस्थानच्या सत्ता संघर्षावर प्रकाश राज यांची टीका

राजस्थानमधील सत्तेसाठी काँग्रेसचा अंतर्गत संघर्ष आता टोकाला पोहचला हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. आमदारांचा घोडेबाजार होत असल्याचा देखील आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. यातच आता राजकीय मुद्यांवर भाष्य करणारे अभिनेते प्रकाश राज यांनी ट्विटरच्या माध्यमातून या सत्ता संघर्षावर टीका केली आहे. यामध्ये त्यांना घोडेबाजारावर जोरदार निशाणा साधला आहे.

प्रकाश राज यांनी भाजपवर टीका करत ट्विट केले की, घोडेबाजार आणि शक्तीचा गैरवापर करून निवडून आले राज्य सरकार एकामागोमाग एक पाडणे… शक्तीसाठी भुकेल्या कट्टर लोकांनो लाज बाळगा… हा लोकशाहीसाठी धोका आहे.

प्रकाश राज यांचे हे ट्विट व्हायरल होत आहे. दरम्यान, राजस्थानातील सत्तानाट्यावरून काँग्रेसने देखील ‘स्पीक अप फॉर डेमोक्रेसी कॅम्पेन’ चालवले आहे.

Loading RSS Feed