गांधी-नेहरू कुटुंबाच्या संपत्तीची होणार चौकशी, हरियाणा सरकारचे आदेश

हरियाणा सरकारने गांधी-नेहरू कुटुंबाच्या संपत्तीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याचे मुख्य सचिव केशनी आनंद अरोरा यांनी हरियाणाच्या शहरी स्थानिक संस्थेच्या विभागाला संपत्तीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 2005 ते 2010 या काळात गांधी-नेहरू कुटुंबाच्या नावावर हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा करण्यात आल्याचा आरोप आहे.

हरियाणामध्ये 2005 ते 2014 या काळात भूपेंद्र सिंह हुड्डा यांचे सरकार होते. या दरम्यान काँग्रेसच्या अनेक संस्था आणि गांधी-नेहरू कुटुंबांसाठी मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा करण्याचा आरोप आहे. काही संपत्तीची आधीपासूनच चौकशी सुरू आहे. आता केंद्र सरकारच्या पत्रानंतर इतर संपत्तीची देखील चौकशी केली जाणार आहे.

केंद्राने हरियाणा सरकारला आदेश दिला आहे की राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट संबंधी संपत्तीची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यासाठी एक कमेटी देखील बनविण्यात आली आहे.

ही कमेटी मनी लाँड्रिंग, परदेशातून आलेल्या निधीसह कायद्याच्या उल्लंघनाचे कथित प्रकरणांची चौकशी केली जाईल.