चीनचा सर्वात जवळील मित्र समजल्या जाणाऱ्या रशियाने देखील आता चीनला मोठा झटका दिला आहे. भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने सध्या एस -400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची डिलिव्हरी चीनला देणे रोखले आहे.
आता रशियाने दिला चीनला मोठा झटका, क्षेपणास्त्राची डिलिव्हरी रोखली
चीनकडून याविषयी सांगण्यात आले आहे की, एका अन्य देशाने दबाव टाकल्याने रशियाने हा निर्णय घेतला आहे. भारताने देखील रशियाकडून ही क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी केली आहे.
एस-400 ला जगातील सर्वोत्तम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीपैकी एक मानले जाते. रशिया व्यतिरिक्त केवळ चीनकडे याचे काही यूनिट्स आहेत. रशियासोबतच्या संरक्षण करारानंतर भारताला यावर्षी याचे काही यूनिट्स मिळणार आहेत. चीनसाठी हा मोठा झटका आहे. कारण एकीकडे रशियाने भारताला वेळेवर डिलिव्हरी देण्याचे वजन दिले आहे. तर दुसरीकडे चीनची डिलिव्हरी थांबवली आहे.
रशियाने देखील स्पष्ट केले आहे की, चीनची एस-400 क्षेपणास्त्र डिलिव्हरी रोखण्यात आली आहे. चीनने या क्षेपणास्त्राच्या प्रशिक्षणासाठी आपल्या काही सैनिकांना देखील रशियाला पाठवले होते. चीनचे स्पष्ट म्हणणे आहे की, रशियाने दबावात येऊन हा निर्णय घेतला आहे.