… म्हणून बकरींना ठोठावण्यात आला 3 हजार रुपये दंड, मारण्यात आली कानाखाली

तेलंगानामधील एक विचित्र प्रकार समोर आला असून, येथे चक्क बकरींना अटक करण्यात आले आहे. झाडे खाल्ल्याने येथे 15 बकरींना पकडण्यात आले आहे. सोबतच प्रत्येक बकरीवर प्रत्येकी 3 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

आज तकच्या वृत्तानुसार, तेलंगानाच्या भद्रादी कोठागुडेम जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी झाडे खाल्ल्याने पकडले आहे. पकडण्यात आलेल्या बकरींना 3 हजार रुपये दंड तर ठोठावण्यात आलाच, सोबतच त्यांच्या कानाखाली देखील मारण्यात आले. ही झाडे वृक्षारोपण अभियानंतर्गत लावण्यात आली होती.

येल्लँडू येथे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाहिले की काही बकऱ्या झाडांना नुकसान पोहचवत आहे. यानंतर कर्मचाऱ्यांनी त्वरित 9 बकरींना पकडले व इतर 6 बकरींना दुसऱ्या दिवशी पकडण्यात आले. सर्व 15 बकरींना आता नगरपालिकेच्या कार्यालयात ठेवण्यात आलेले आहे. कर्मचारी त्यांना जेवण देत आहे. बकरींच्या मालकांना नोटीस पाठविण्यात आली आहे, मात्र अद्याप कोणीही त्यांना घेण्यास आलेले नाही.