कोरोना प्रतिबंधक औषधाच्या संशोधना दरम्यान हे तीन शास्त्रज्ञ झाले कोट्याधीश


संपूर्ण जगावर ओढावलेले कोरोनाचे दुष्ट संकट दिवसेंदिवस अजूनच गडद होत असल्यामुळे या दुष्ट व्हायरसचा नायनाट करण्यासाठी संशोधन सुरु असलेल्या औषधावर जगभरातील प्रत्येक नागरिकाच्या नजरा लागून राहिल्या आहेत. त्याचबरोबर जगभरातील शेकडो संशोधन संस्था आणि संशोधक या रोगावरील प्रतिबंधक औषधाच्या संशोधनावर अहोरात्र प्रयत्न करत आहेत.

hi-in.facebook.com

दरम्यान, कोरोना प्रतिबंधक औषधावर सुरु असलेल्या संशोधनामुळे बिटनमधील तीन प्राध्यापक रातोरात करोडपती झाले आहेत. प्राध्यापक रटको जुकानोव्हिक, स्टीफन होलगेट आणि डोन्ना डेव्हिस यांच्या कंपनीच्या (सिनेरजेन) शेअरचे भाव रातोरात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या तिन्ही शास्त्रज्ञांच्या कंपनीच्या शेअरचा भाव आतापर्यंत तब्बल तीन हजार पटींनी वाढला आहे.

NC3Rs

सिनेरजेन नावाची कंपनी प्राध्यापक रटको जुकानोव्हिक, स्टीफन होलगेट आणि डोन्ना डेव्हिस यांनी स्थापन केली आहे. कोरोनावरील एका औषधाची चाचणी या कंपनीने घेतली होती. या चाचणीमध्ये ज्या रुग्णांना कोरोना प्रतिबंधक औषध देण्यात आले होते. त्यांच्यापैकी ७९ टक्के रुग्णांची गंभीरपणे आजारी पडण्याची शक्यता कमी झाली आहे.

YouTube

सुमारे २० वर्षांपूर्वीच या औषधाचा शोध ब्रिटनमधील साऊथ्म्टन विद्यापीठाच्या मेडिसीन स्कूलमधील तिन्ही प्राध्यापकांनी लावला होता. इन्टरफेरोन बीटा नावाच्या प्रोटीनची दमा आणि क्रोनिक लंग डिसीजच्या रुग्णामध्ये कमतरता असते, याचा शोध त्यांनी लावला होता. कॉमन कोल्डशी लढण्यामध्ये हे प्रोटीन मदत करते. दरम्यान, ज्या प्रोटीनची कमतरता आहे, त्याची पूर्तता केली गेल्यास व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यात रुग्णाला मदत मिळू शकते.

दरम्यान, या शास्त्रज्ञांनी सिनेरजेन नावाची कंपनी आपण लावलेल्या शोधावर औषधाची निर्मिती करण्यासाठी स्थापन केली. २००४ मध्येच स्टॉक मार्केटमध्ये ही कंपनी आली होती. पण कोरोनाच्या संकटकाळात कंपनीने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये इंटरफेरोन बीटा या प्रोटीनचा समावेश असलेल्या एसएनजी ००१ या औषधाची वैद्यकीय चाचणी सुरू केली. त्यानंतर याच आठवड्यात या शोधाचे प्राथमिक निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत.

PMLiVE

चाचणीदरम्यान, एसएनजी ००१ औषधाचे रुग्णाच्या थेट फुप्फुसामध्ये डोस दिले गेले. दरम्यान, या औषधामुळे रुग्णाच्या आजारपणातून बरे होण्याची शक्यता दोन ते तीन पटींनी वाढली. १०१ लोकांचा समावेश या वैद्यकीय चाचणीत करण्यात आला होता. दरम्यान, या चाचणीचे अहवाल समोर आल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या कंपनीमध्ये केवळ ०.५६ ते ०.५९ एवढी भागीदारी असूनही शेअरच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याने या तिन्ही प्राध्यापकांना १५ ते १६ कोटी रुपये मिळाले आहेत.