जाणून घ्या कोण आहेत ‘कारगिल गर्ल’ गुंजन सक्सेना


करण जोहरचे प्रोडक्शन हाउस धर्मा प्रोडक्शनने आपला पुढील चित्रपट ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’चे पोस्टर रिलीज केले आहे. हा चित्रपट आयएएफची महिला पायलट गुंजन सक्सेना यांच्यावर आधारित आहेत. चित्रपटामध्ये गुंजनची भूमिका जान्हवी कपूर साकारणार आहे. तर तिच्या वडिलांची भूमिका पंकज त्रिपाठी साकारणार आहेत. मात्र गुंजन सक्सेना नक्की कोण आहे जाणून घेऊया.

गुंजन सक्सेना भारतीय वायूदलात फ्लाइट लेफ्टिनेंट होत्या. 44 वर्षीय गुंजन आता निवृत्त झाल्या आहेत. त्यांना कारगिल गर्ल या नावाने देखील ओळखले जाते. गुंजनला तिच्या साहसासाठी शौर्य पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. गुंजन सक्सेना यांनी दाखवून दिले की, महिला या युध्दाच्या मैदानावर देखील स्वतःचे कर्तुत्व सिध्द करून दाखवतात.

कारगिल युध्दा दरम्यान त्यांनी चीता हॅलिकॉप्टर उडवले होते. पाकिस्तानी सैनिक मिसाइल लाँचरद्वारे हल्ला करत होते. गुंजन यांच्या हॅलिकॉप्टरवर देखील मिसाइल हल्ला करण्यात आला होता मात्र त्या थोडक्यात बचावल्या. अनेक जखमी सैनिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम त्या करत होत्या.

गुंजन हंसराज कॉलेजमध्ये ग्रज्युएशनचे शिक्षण घेत असतानाच सफदरगंज फ्लाइंग क्लबमध्ये ज्वाइन झाल्या होत्या. त्यावेळी तिचे वडिल आणि दोन्ही भाऊ सैन्यात कार्यरत होते. याचवेळी त्यांना समजले की, IAF मध्ये पहिल्यांदा महिला पायलट्सची भर्ती करण्यात येत आहे व त्या एसएसबी परिक्षा पास करत वायूदलात भर्ती झाल्या. त्यावेळी वायूदलात महिलांनी भर्ती होणे एवढे सोपे नव्हते. मात्र त्यांच्या बॅचच्या महिलांनी वायूदलात विमान उडवत इतिहास रचला. 1999 मध्ये कारगिल युध्दा दरम्यान देखील या युवतींनी स्वतःला सिध्द करून दाखवले.

Leave a Comment