कारगिलमध्ये आजच्या दिवशी फडकला होता विजयी ध्वज

२६ जुलै हा दिवस संपूर्ण भारतासाठी खूप महत्वाचा असून भारतीय सैनिकांनी आजच्याच दिवशी पाकिस्तानी सैनिकांना धूळ चारत कारगिलमध्ये विजयी ध्वज फडकवला होता. प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावते असा हा ‘कारगिल विजय’ दिवस या युध्दात अनेक भारतीय सैनिकांना हौतात्मय प्राप्त झाले होते. भारतीय सैनिकांनी शौर्य आणि बलिदानाचा एक नवा आदर्श जगासमोर ठेवला आहे.

कारगिल युद्ध हे दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते त्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष या युद्धाकडे होते. परंतु भारताने हे युद्ध कारगीलपुरतेच मर्यादित ठेवले. त्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले होते. आजचा हा दिवस कारगिल युध्दातील शहीद सैनिकांना अभिवादन करण्याचा आहे. भारतीय सैनिकांनी ६० दिवस केलेली कामगिरी म्हणजेच ऑपेशन विजय.

Leave a Comment