कारगिलचे युद्ध हा खरा विजय

कारगिल युद्धाच्या विजयाचा आज वर्धापनदिन आहे. पाकिस्तान गेल्या पासष्ट वर्षात आपल्या नेहेमीच खोड्या काढत आला आहे आणि प्रत्येक वेळेला आपण त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. तरीही गेल्या पासष्ट वर्षातील सर्व आक्रमणाच्या तुलनेत कारगिलचे निराळेपण विशेष आहे. कारण आजपर्यंतच्या सर्व युद्धात आपण रणभूमीवर विजय आणि चर्चेच्या भूमीवर पराभव पत्करला आहे. खरे म्हणजे आजपर्यंत आपण कधीच सांप्रदायिक हेतूने इतर देशांवर आक्रमण केलेले नाही. आपले माजी राष्ट्रपती श्री. अब्दुल कलाम यांचा नेहमी उल्लेख करतात. सांप्रदायिक किंचा धामिद्दक उद्देेेेशाने भारतातील कोणत्याच हिंदू राजाने इतरांवर कधी हल्ला केला नाही. उलट, आपल्या देशावर प्राचीन काळापासून सतत हल्ले होत राहिले भारताला स्वातंत्र्य मिळून एक वर्षे होते न होते तोच गेल्या पंधराशे वर्षाच्या परंपरेला जागून शेजारी नव्याने निर्माण झालेल्या शत्रूने भारतावर हल्ला केला. या पहिल्याच युद्धाचा परिणाम असा की, आपण 86000 चौरस किमीचा प्रदेश पाकिस्तानच्या घशात घातला. आपला 86000 चौ. कि. मी. चा प्रदेश अजूनही पाकिस्तानच्या ताब्यात आहे.

वास्तविक पाकिस्तानच्या अनुभवावरून आपण सावध व्हायला हवे होते. पण 1962 साली ‘पंचशील’ तत्वाचे पालन करणार्‍या व ’हिंदी चीनी भाई भाई’ अशी घोषणा देणार्‍या भारतावर चीनने धावा केला ! गाफील असलेल्या भारताचा जवळ जवळ 1,20,000 चौ. कि. मी. भाग चीनच्या वर्चस्वाखाली गेला. त्यांनतरही चीन अनेक वेळा भारताचे अरुणाचलसारखे प्रदेश स्वत:चे असल्याचे दाखवित असतो.आता तर जवळजवळ दररोज चीनी सैन्य आपल्या सीमा ओलांडून भारतात घुसखोरी करत आहे. अनेक वेळा भारताच्या चीन बरोबर चर्चेच्या फेर्‍या झाल्या पण आजही युध्दात किंवा त्यापूर्वी गमावलेला प्रदेश चीनच्या ताब्यात आहे.

त्यानंतर 2,3 वर्षातच 1965 साली पाकिस्तानने भारतावर पुन्हा हल्ला केला. भारताने लाहोरपर्यतचा जवळ जवळ 2000 चौ. कि. मी. प्रदेश जिंकला.(मा. अण्णा हजारे त्यावेळी सैनिक असतांना स्वत: लाहोरपर्यत गेल्याची आठवण सांगतात .) त्यानंतर युध्द थांबवण्यात आले. नंतर आपले त्यावेळचे पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री रशियातील ताश्कंदला गेले.आणि तिथे पाकिस्तान सोबत तह केला. त्यात, भारताने पाकिस्तानचा त्या युध्दात जिंकलेला सर्व प्रदेश पाकिस्तानला परत केला. भारतीय वीरांनी प्राणांचे बलिदान करुन शत्रूचा युध्दात जिंकलेला प्रदेश राजकीय तहात पाकिस्तानला परत करण्यात आला. खरेतर ही भूमी 1947 पर्यर्ंत आपलीच होती, ती भारतीय वीरांनी युध्दात जिंकलेली होती, ती आपल्याकडे ठेवता आली असती .. ती असती तर पाकिस्तानवर सतत दबाव ठेवण्यासाठी तिचा उपयोग झाला असता .. आज पाकिस्तानचे पावूल वाकडे पडले नसते .. पण असो, रणांगणावर जिंकलेला भारत तहात हरला.

नंतर उजाडले 1971. या वर्षाच्या अखेरीस पाकिस्तानने पुन्हा आगळीक केली आणि भारतावर हल्ला केला. यावेळेस युध्द दोन्ही सीमांवर म्हणजे भारताच्या पश्‍चिमी सीमा व पूर्वेकडील बंगालला लागून असलेल्या सीमेवर युध्द झाले.हे युध्द अव्दितीय होते.दोन्ही सीमांवर हिंदूस्थानी सैन्याने एवढा भीमपराक्रम गाजविला की पश्‍चिम पाकिस्तानातील जवळ जवळ 14000 चौ. कि. मी. प्रदेश भारताच्या ताब्यात आला आणि पूर्व पाकिस्तान तर आपण पूर्णर्ं पणे जिंकला. लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग आरोरा यांच्या नेत्वृत्वाखाली भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तानात घूसून तेथील पाकिस्तानी सैन्याला धूळ चारली व 90000 पाकिस्तानी सैनिक कैद केले. 16 डिसेंबर 1971 ला पाकिस्तानने जनरल नियाझींच्या नेतृत्वाखाली भारतासमोर शरणागती पत्करली.त्यानंतर युध्द थांबले.भारताने पुन्हा एकदा जिंकलेला पूर्वर्ं पाकिस्तान ’बांगला देश’ म्हणून सोडून दिला.आणि पूढे केलेल्या ’सिमला करारात’ तर लाख भर पाकिस्तानी सैनिंकांच्या मुक्ततेसह पश्‍चिम पाकिस्तानचा जवळ जवळ 14000 कि. मी. चा जिंकलेला प्रदेश देखिल परत पाकिस्तानला बहाल केला. पुन्हा तेच.रणांगणात विश्वविजय पण तहात फुटकी कवडी देखिल हाती नाही.

नंतर आले 1999. या वर्षाच्या सुरुवातीस आपले पंतपधान अटलबिहारी वाजपेयी लाहोरला गेले. ’संवादाने समस्या सोडवू या व सौहार्द्र वाढवू या’ अशा विचारांनी त्यांनी लाहोरभेट केली.पण पुन्हा पाकिस्तानने पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी चलाखी केली. नागरी वेषात काश्मिरच्या कारगिलमध्ये सैन्य पाठविले. ’ते इस्लामी आतंकवादी आहेत’ असा जगाचा ग्रह होईल व काश्मिरच्या प्रश्‍नाला बळकटी येईल, तसेच काश्मिर देखिल भारताकडून टप्याटप्याने जिंकता येईल असा त्यांचा होरा होता. (याबट्टल कानावर हात ठेवणार्‍या पाकिस्तानचे पितळ ’ते पाकिस्तानी सैनिकच होते’ हे नुकतेच पाकिस्तानच्या जनरल शाहिद अझिज व मुशर्रफ यांनी मान्य केल्यामुळे उघडे पडले आहे.) पण उशीरा का होईना भारताच्या ते लक्षात आले व आपल्या सैन्याने अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थिती आणि नैसर्गिक हवामान असून देखील प्रतिहल्ला चढविला व एकेक करत आपला शत्रूकडे गमावलेला जवळ जवळ 250 चौ. कि. मी. प्रदेश परत आपल्या ताब्यात घेतला. तो दिवस होता 26 जुलै 1999 चा.या नंतर पाकिस्तान बरोबर अनेकदा बोलणी झाली .पण युध्दात जिंकून तहात हरण्याचा अविकेकीपणा या वेळी मात्र भारताने केला नाही, त्यामुळे कारगिलचा विजय हाच भारताचा विजय म्हणावा लागेल.

Leave a Comment