मोदींनी घेतली सुशांतच्या आत्महत्येच्या सीबीआय चौकशीच्या मागणीची दखल


अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी याची मागणी जोर धरू लागली असून यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पत्र लिहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता त्याची दखल घेतली आहे. त्याचबरोबर हे पत्र पंतप्रधान कार्यालयाने स्वीकारले आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी अधिवक्ता इशकरण सिंह भंडारी यांच्याकडे सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आवश्यक तथ्य आणि पुरावे जमा करण्याची जबाबदारी सोपवली होती. हे पत्र पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) स्वीकारल्याची माहिती इशकरण यांनी ट्विट करून दिली आहे. हे पत्रदेखील आपल्या ट्विटसह इशकरण यांनी जोडले आहे.

मुंबईत वांद्र्यातील राहत्या घरात सुशांतने 14 जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. मुंबई पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली जाते आहे. अशी मागणी अभिनेता शेखर सुमन, भाजप खासदार रूपा गांगुगी, सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि सुशांतच्या चाहत्यांनीदेखील केली आहे.