कारगिल दिन: पंतप्रधानांचे शहिदांना अभिवादन - Majha Paper

कारगिल दिन: पंतप्रधानांचे शहिदांना अभिवादन


नवी दिल्ली: कारगिल विजय दिन हा भारतीय सैन्याचा पराक्रम आणि त्यागाचा प्रत्यय देणारा आहे; अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलच्या युद्धात बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सन १९९९ मध्ये लडाख येथील कारगिलच्या परिसरात असलेल्या; हिवाळ्यात भारतीय सैन्याने रिकाम्या केलेल्या ठाण्यांवर अतिक्रमण करून पाकिस्तानी सैन्याने कब्जा केला होता. भारतीय सैन्याने सलग ३ महिने पाक सैन्याशी संघर्ष करून या ठाण्यांचा पुन्हा ताबा घेतला. या युद्धात भारतीय सैन्याने प्राप्त केलेल्या विजयानिमित्त २६ जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो.

या दिवसाचे औचित्य साधून कारगिलच्या युद्धात देशाचा स्वाभिमान कायम राखण्यासाठी आणि भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी कारगिलमध्ये प्राणपणाने लढून विजयश्री प्राप्त करणाऱ्या सानिकानाचे आपण स्मरण करीत असल्याचे पंतप्रधानांनी ट्विटरवर नमूद केले आहे.

Leave a Comment