यूपीएससीमध्ये विविध पदासांठी नोकरीची सुवर्णसंधी

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) असिस्टेंट प्रोफेसर आणि अन्य विविध पदासांठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवार यूपीएससीची अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 24 जुलै 2020 पासून सुरू झाली असून, अर्जाची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2020 आहे.

एकूण 121 जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या पदांमध्ये मेडिकल ऑफिसर/रिसर्च ऑफिसर – 36, असिस्‍टेंट इंजिनिअर – 3 , स्‍पेशलिस्‍ट ग्रेड III असिस्‍टेंट प्रोफेसर – 60,  सीनियर साइंयंटिस्‍ट ऑफिसर – 21 आणि आर्किटेक्‍ट (ग्रुप -A) पदासाठी 1 जागा आहे.

शिक्षण व वयाची अट ही पदानुसार वेगवेगळी आहे. इच्छुक उमेदवार वेबसाईट संपुर्ण माहिती मिळवू शकतात. उमेदवारांची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर होईल.

इच्छुक उमेदवार एसबीआय नेटबँकिंग सुविधेचा किंवा व्हिजा/मास्टर क्रेडिट/डिबेट कार्टचा वापर करून अर्जाचे ऑनलाईन शुल्क 25 रुपये भरू शकतात. एससी/एसटी/पीएच/महिला उमेदवारांसाठी अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही.