सोनिया गांधींनी केले नरसिंहराव यांचे कौतुक; नातूने विचारले, ‘16 वर्ष का लागले ?’

देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने काँग्रेसने कार्यक्रमांचे आयोजन केले होते. काल दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नरसिंहराव यांचे कौतुक देखील केले व काँग्रेसला त्यांच्या उपलब्धी आणि योगदानावर गर्व असल्याचे म्हटले.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान झाले, त्यावेळी देश आर्थिक संकटात होता. त्यांच्या बोल्ड लीडरशीपमुळे देश अनेक आव्हानांना यशस्वीरित्या सामोरा गेला. मात्र यावरून आता नरसिंहराव यांचे नातू आणि तेलंगाना भाजप नेते एनव्ही सुभाष यांनी प्रश्न उपस्थित केले आहे.

एनव्ही सुभाष म्हणाले की, काँग्रेसला त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्यासाठी 16 वर्ष का लागले ? सोनिया आणि राहुल गांधी पी. व्ही. नरसिंहराव यांच्याशी संबंधित जयंती आणि पुण्यतिथी कार्यक्रमात सहभागी झाले नाही.

दरम्यान, 28 जून 1921 ला जन्म झालेल्या नरसिंहराव यांचे 23 डिसेंबर 2004 ला निधन झाले होते. काँग्रेस आता त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने कार्यक्रम करत आहे.