जास्त वजन असणाऱ्यांना कोरोनामुळे मृत्यूचा धोका तीनपट अधिक, अभ्यासात दावा

कोरोना व्हायरसमुळे अधिक वजन असणाऱ्या लोकांना मृत्यूचा धोका इतरांपेक्षा तीनपट अधिक वाढतो. याबाबतचा खुलासा ब्रिटनची सरकारी एजेंसी पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. कोरोनामुळे आजारी पडलेल्या लठ्ठ व्यक्तींना व्हेंटिलेटरची आवश्यकता देखील 7 पटीने वाढते. वॉडी मास इंडेक्स 25 पेक्षा वरती असल्यावर व्यक्तीचे वजन अधिक असल्याचे समजले जाते. बॉडी मास इंडेक्स 30 ते 35 असल्यावर कोरोनामुळे मृत्यूचा धोका 40 टक्के वाढतो.

रिपोर्टनुसार, बॉडी मास इंडेक्स 25 पेक्षा वरती असल्यावर कोरोनामुळे गंभीररित्या आजारी पडण्याचा धोका दुप्पटीने आणि मृत्यूचा धोका 3 पटीने वाढतो. मात्र अधिक वजनामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढत नाही.

पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अधिक चरबी असल्यास रेस्पिरेटरी प्रणाली प्रभावित होते व याचा शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. याआधी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले होते की, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने लोकांना आपले वजन कमी करावे.

ब्रिटनमध्ये आतापर्यंत 45,700 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, याचे कारण लठ्ठपणा असू शकतो.