इस्त्रायलमध्ये वाढली कोरोनाग्रस्तांची संख्या, निदर्शकांनी बंद केले पंतप्रधानांच्या घराचे रस्ते

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. इस्त्रायलमध्ये ही संख्या जवळपास 60 हजार आहे, तर मृतांचा आकडा 450 च्या जवळ पोहचला आहे. असे असले तरी येथील युवक सरकारच्या धोरणावर चांगलेच भडकले असून, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या घराबाहेर मागील तीन दिवसांपासून निदर्शन करत आहेत.

Image Credited – Aajtak

निदर्शन करणाऱ्या युवकांचा आरोप आहे की पंतप्रधानांनी कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत. निदर्शकांनी पंतप्रधान नेतान्याहू यांच्या राजीनामाच्या मागणी केली असून, त्यांच्या सरकारी घराबाहेरील सर्व रस्ते बंद केले आहेत. निदर्शकांमध्ये युवकांची मोठी संख्या आहे.

Image Credited – Aajtak

या निदर्शकांमधील 25 वर्षीय मायान श्रेम (माजी सैनिक) म्हणाले की, आम्ही देशासाठी लढणे थांबवणार नाही. तर त्यांचा मित्र 26 वर्षीय ओरेन म्हणाले की, बदल खालील स्तरापासूनच येतो. सुरूवातीला कोरोनावर नियंत्रण मिळवल्याने पंतप्रधानांचे कौतुक होत होते. रुग्ण कमी येत असल्याने अनेक हॉस्पिटल बंद करावे लागले होते. मे मध्ये नेतान्याहू यांनी कोरोनावर मात केल्याचे देखील जाहिर केले.

Image Credited – Aajtak

मात्र, नेतान्याहू यांच्याकडून लोकांना बाहेर पडण्याचे आवाहन केल्यानंतर काही आठवड्यातच परिस्थिती आणखीन बिघडली. येथे दररोज 2 हजार कोरोनाग्रस्त सापडत आहे. या निदर्शकांना रोखण्यासाठी आता तेथील सरकार बळाचा देखील वापर करत आहे.