अमेरिकेत एफबीआयची मोठी कारवाई, सैन्याशी संबंध असलेल्या चीनी विद्यार्थ्यांना अटक - Majha Paper

अमेरिकेत एफबीआयची मोठी कारवाई, सैन्याशी संबंध असलेल्या चीनी विद्यार्थ्यांना अटक

अमेरिकेच्या फेडरल प्रोस्यूकेटर्सने चीनच्या 4 नागरिकांविरोधात व्हिसा फसवणूक आणि चीनचे सदस्य असल्याची माहिती लपवल्याच्या आरोपाखाली खटला दाखल केला आहे. न्याय विभागने सांगितले की, एफबीआयने यातील 3 जणांना अटक केले आहे. तर फरार चौथ्या व्यक्तीने सॅन फ्राँसिस्कोच्या चीन वाणिज्य दूतावासात शरण घेतली आहे. या सर्वांविरोधात व्हिजा फसवणुकींतर्गत तक्रार दाखल केली आहे. दोषी आढळल्यास त्यांना 10 वर्षांची जेल आणि अडीच लाख डॉलर दंडाची शिक्षा होऊ शकते.

एफबीआयने 25 पेक्षा अधिक अमेरिकन शहरांमध्ये व्हिजाधारकांची चौकशी केली. या सर्वांवर चीनी सैन्याशी असलेले संबंध लपवल्याची शंका होती. राष्ट्रीय सुरक्षाचे सहाय्यक अटॉर्नी जनरल जॉन सी. डेमर्स म्हणाले की, चीनच्या पीपल लिबरेशन आर्मीच्या (पीएल) या सदस्यांना सैन्याशी असलेले आपले संबंध लपवत व्हिसासाठी अर्ज केला होता. आमच्या खुल्या समाजात आणि शैक्षणिक संस्थांचा अयोग्यरित्या फायदा घेण्यासाठी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या आणखी एका योजनेचा हा एक भाग आहे. आम्ही एफबीआय सोबत मिळून या संदर्भात चौकशी सुरू ठेवू.

एफबीआयचे राष्ट्रीय सुरक्षा शाखेचे कार्यकारी सहाय्यक संचालक जॉन ब्राउन यांनी म्हटले की, यावरून लक्षात येते की चीनी सरकार घुसखोरी आणि शोषण करण्यासाठी अत्यंत टोकापर्यंत गेले आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेले चीनी नागरिकांनी शिक्षण आणि रिसर्चच्या नावाखाली अमेरिकेत प्रवेश केला होता.