भारतात लाँच झाले कोरोनावरील आतापर्यंतचे सर्वात स्वस्त औषध

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर स्वस्त औषध उपलब्ध करून देण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे. आता भारतात आणखी एक स्वस्त कोरोनावरील औषध लाँच झाले आहे. या औषधाला जेनबर्कट फार्मास्यूटिकल्स या औषध कंपनीने बनवले आहे. या औषधाचे नाव फँव्हिवेंट असून, बाजारात याची फॅव्हिपिरावीर नावाने विक्री होते.

जेनबर्कट फार्मास्यूटिकल्स म्हटले आहे की, या औषधाच्या टॅबलेटची किंमत केवळ 39 रुपये आहे. या औषधाला कोरोनाचे हलके व मध्यम लक्षण असणाऱ्या रुग्णांना दिले जाईल. फॅव्हिवेंट 200 मिलिग्रॅम टॅबलेटमध्ये येईल. ज्याच्या एका पाकिटामध्ये 10 टॅबलेट असतील. कंपनीने सांगितले आहे की, या औषधाची निर्मिती तेलंगानाच्य एका फार्मास्युटिकल प्लांटमध्ये केले जाईल.

याआधी फार्मा कंपनी ब्रिंटन फार्मास्युटिकल्सने सांगितले होते की, कंपनी फॅव्हिटॉन नावाने फॅव्हिपिरावीर औषध 59 रुपये प्रति टॅबलेटने विकत आहे. तर फार्मा कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स आधीपासूनच फॅबिफ्लू नावाने 75 रुपये प्रति टॅबलेटने या औषधाला बाजारात लाँच केले आहे.