युट्यूबर कॅरी मिनाटीचा चॅनेल हॅक, हॅकरने मागितले 'Bitcoin' - Majha Paper

युट्यूबर कॅरी मिनाटीचा चॅनेल हॅक, हॅकरने मागितले ‘Bitcoin’

टीक-टॉकवर निशाणा साधल्यावर चर्चेत आलेल्या युट्यूबर अजेय नायरचा (कॅरी मिनाटी) युट्यूब चॅनल हॅक झाला आहे. कॅरी मिनाटी युट्यूबवर गेमिंग चॅनेल CarryisLive नावाने चालवतो. या चॅनेलवर तो गेमिंगसंबंधी व्हिडीओ शेअर करतो. हाच चॅनेल हॅक झाला आहे.

कॅरी मिनाटीला या हॅकिंगची माहिती त्याच्या फॅन्सने दिली. त्यानंतर त्याने ट्विट करत याबाबतची पुष्टी केली. सुरूवातीच्या रिपोर्टनुसार, या चॅनेलचे हॅकिंग बिटकॉईन हॅकिंगसाठी झाले आहे. हॅकर लोकांकडे देशात आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी दान मागत होता.

हॅकरने चॅनेलचे डिस्क्रिप्शन देखील बदलले आहे. याशिवाय चॅनेलवर डोनेशन असणारे व्हिडीओ टाकत आहेत. एका व्हिडीओमध्ये हॅकर आसाम आणि बिहारमध्ये आलेल्या पुरग्रस्तांसाठी मदत मागत आहेत.