भारतात कोरानाशी दोन हात करण्याची क्षमता – डब्ल्यूएचओ

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातील 180 पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे. दीड कोटींपेक्षा अधिक जणांना याची लागण झाली आहे, तर मृतांचा आकडा 6 लाखांच्या पुढे गेला आहे.

या व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण अमेरिका, ब्राझील आणि भारत या तीन देशांमध्ये आहेत. हे तिन्ही देश कोरोना व्हायरसशी लढण्यास सक्षम असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) व्यक्त केले आहे.

डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉक्टर माइक रयान म्हणाले की, अमेरिका, ब्राझील आणि भारत हे शक्तीशाली आणि समर्थ आहेत. त्यांची अंतर्गत क्षमता कोरोना व्हायरसशी सहज लढू शकते.

दरम्यान, आतापर्यंत अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 40 लाखांच्या जवळ पोहचला आहे. तर ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 22 लाख आणि भारतात 12 लाखांच्या पुढे गेली आहे.