नव्या फिचरच्या मदतीने एकाच नंबरवरून अनेक डिव्हाइसमध्ये व्हॉट्सअॅप वापरणे शक्य


नवी दिल्ली : सध्याच्या घडीला सगळ्यांच्याच गळ्यातील ताईत असलेले इंस्टंट मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप दरवेळेस आपल्या युजर्ससाठी काहीना काही नवीन फिचर्स घेऊन येत असते. त्यातच आता आपल्या युजर्ससाठी असेच एक नवे फिचर लवकरच व्हॉट्सअॅप लॉन्च करणार आहे. कंपनी गेल्या अनेक दिवसांपासून एका मल्टी डिवाइस सपॉर्ट फीचरवर काम करत होती. लवकरच हे फिचर युजर्सला वापरता येणार आहे. युजर्स या फिचरचा वापर करून एकाच नंबरचा वापर करून अनेक फोनमध्ये व्हॉट्सअॅप सुरु ठेवू शकणार आहेत.

व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरसंदर्भातील माहिती व्हॉट्सअॅपच्या नव्या अपडेट्स आणि लेटेस्ट फिचर्सवर नजर ठेवणारी साइट WABetaInfo ने दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिंक्ड डिव्हाइसेज नावाचे वेगळे सेक्शन व्हॉट्सअॅपमध्ये देण्यात येणार आहे. ज्यामार्फत कोणत्या डिव्हाइसमध्ये एकाच नंबर वरून अकाउंट सुरु आहे, याची माहिती मिळणार आहे. हे सेक्शन युजर्सना व्हॉट्सअॅप मेन्यूमध्ये देण्यात येणार आहे.

युजर्सना व्हॉट्सअॅपच्या या सेक्शनमध्ये आधीपासून लिंक करण्यात आलेले डिव्हाइसही दिसणार आहेत. तसेच त्या डिव्हाइसवर व्हॉट्सअॅप लास्टटाइम कधी अॅक्टिव्ह होते, ते देखील समजणार आहे. तसेच याव्यतिरिक्त व्हॉट्सअॅप अॅडव्हान्स सर्च मोड देखील लवकरच घेऊन येणार आहे.

अॅपच्या अॅन्ड्रॉइड बीटा वर्जन 2.20.196.8 मध्ये व्हॉट्सअॅपचे हे फिचर दिसून आले आहे. अॅपचे नवे फिचर्स सध्या अंडर डेव्हलपमेंट असल्यामुळे सध्या हे बीटा युजर्ससाठी वापरण्यात आलेले नाही. मीडिया रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये सुरु राहण्यासाठी Wi-Fi Sync ची गरज पडू शकते.