पुण्यातील ‘त्या’ वॉरिअर आजीला मदत करणार रितेश देशमुख

कोरोना व्हायरसने संपुर्ण जग बदलून टाकले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे पोट भरण्यासाठी पडेल ते काम करावे लागत आहे. पुण्यातील अशाच एका वॉरिअर आजीबाईंचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.  हा व्हिडीओ पुण्यातील हडपसर येथील असल्याचे सांगितले जात आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी एक वृद्ध महिला आपले कौशल्य दाखवत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आजी रस्त्यावर कसरत दाखवत आहे. त्या बांबू स्टिकने स्टंट करत आहेत, जे बघून प्रत्येकजण हैराण होत आहे. पैशांसाठी त्यांना या वयातही हे करावे लागत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून, नेटकरी महिलेच्या हिंमतीची आणि कौशल्याचे कौतुक करत आहेत.

अभिनेता रितेश देशमुखने देखील या आजींचा व्हिडीओ शेअर करत त्यांना वॉरिअर आजी म्हटले आहे. सोबतच त्यांना मदत करण्यासाठी संपर्क देखील साधला.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या आजींसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आजींच्या कौशल्याचे नेटकरी भरभरून कौतुक होत आहे.