वाह!… म्हणून गावकऱ्यांनी 35 दिवस गावात लाईट लावली नाही

मनुष्य आणि प्राण्यांचे नाते खूप जुने आहे. अनेक पक्षी आपल्या घराच्या आजुबाजूला घरटी बांधत असतात. असेच एक घरटे पक्षाने रस्त्यावरील लाईटीच्या मुख्य स्विचबोर्डवर बांधले होते. अंडे देखील दिले होते. जेव्हा गावकऱ्यांना याच्याबाबत समजले, तेव्हा त्यांनी स्ट्रिट लाईट चालू करणे बंद केले. त्यांनी जवळपास 35 दिवस स्विचबोर्डचा वापर केला नाही.

तामिळनाडूच्या शिवगंगा येथील गावात ही घटना घडली आहे. गावातील लोकांना दिसले की, एका पक्ष्याने स्विच बोर्डच्या आत आपले घरटे बांधले आहे. यात तीन निळे आणि एक हिरव्या रंगाचे अंडे होते.

यानंतर एका व्यक्तीने या अंडी आणि पक्ष्यांचा फोटो गावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकले. यानंतर सर्वांनी निर्णय घेतला की, जोपर्यंत पिल्लं अंड्यातून बाहेर येत नाही, तोपर्यंत स्विच बोर्डचा वापर करायचा नाही व लाईट देखील लावायची नाही. स्विच बोर्डचा वापर करताना अंडी व घरट्याला नुकसान पोहचू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

पंचायतचे अध्यक्ष एच कालीश्वरी देखील या मोहिमेत सहभागी झाले. काही लोकांनी याला विरोध देखील केला. मात्र गावकऱ्यांनी त्यांना समजवले. गावकऱ्यांनी यावर बैठक घेत, लाईट बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला. या पक्षांचे घर वाचविण्यासाठी गावकऱ्यांनी मन मोठे करत काही दिवस अंधारातच राहण्याचा निर्णय घेतला.