… म्हणून डास पितात मनुष्याचे रक्त, वैज्ञानिकांनी शोधले कारण

तुम्हाला माहिती आहे मच्छर तुमचे रक्त का पितात ? त्यांना रक्त पिण्याची सवय कशी लागली ? याचे उत्तर वैज्ञानिकांनी शोधले आहे. याचे कारण हैराण करणारे आहे. कारण मच्छरांना सुरूवातीच्या काळात रक्त पिण्याची सवय नव्हती. यात हळूहळू बदल झालेला आहे. डासांनी मानवाचे आणि इतर प्राण्यांचे रक्त पिण्यास सुरुवात केली कारण ते कोरड्या प्रदेशात राहत असे. जेव्हा जेव्हा हवामान कोरडे असते आणि डासांना त्यांच्या प्रजननासाठी पाणी मिळत नाही, तेव्हा ते मानवाचे किंवा प्राण्यांचे रक्त शोषू लागतात.

Image Credited – Aajtak

न्यू जर्सी येथील प्रिंस्टन यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी आफ्रिकेतील एडिस एजिप्टी या मच्छराचा अभ्यास केला. याच मच्छरामुळे जिका व्हायरस, डेंग्यू सारखे आजार पसरतात. न्यू सायंटिस्टमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, आफ्रिकेत एडिस एजिप्टी मच्छराच्या अनेक प्रजाती आहेत. सर्व प्रजाती रक्त पित नाहीत. ते अन्य गोष्टी खाऊन जगतात.

Image Credited – Aajtak

प्रिंस्टन यूनिव्हर्सिटीच्या संशोधक नोआह रोज यांनी सांगितले की, कोणीही मच्छरांच्या विविध प्रजातींच्या खाण्या-पिण्याबाबत अभ्यास केलेला नाही. आम्ही आफ्रिकेच्या सब-सहारन भागातील 27 ठिकाणांवरून एडिस एजिप्टी मच्छराची अंडी घेतली. त्यानंतर आम्ही मच्छरांना बाहेर पडू दिले व त्यांना लॅबमध्ये मनुष्य व इतर प्राण्यांवर सोडले. जेणेकरून, त्यांच्या रक्त पिण्याच्या पॅटर्नला समजता येईल. या मच्छरांची खाण्या-पिण्याची पद्धत वेगवेगळी निघाली.

Image Credited – Aajtak

त्यांनी सांगितले की, सर्व मच्छर रक्त पितात ही माहिती चुकीची निघाली. ज्या भागामध्ये भीषण दुष्काळ आणि गरमी अधिक असते व पाणी कमी असते. तेथे मच्छरांना प्रजननासाठी आर्द्रता आवश्यक आहे. पाण्याची कमतरता भागविण्यासाठी डास मानवांचा व इतर प्राण्यांचे रक्त पिण्यास सुरूवात करतात. मच्छरांमध्ये हा बदल अनेक हजारो वर्षात आला आहे. मच्छरांना पाण्याची कमतरता जाणवताच ते अन्य जीवांचे रक्त शोषू लागतात.