या दुर्मिळ फोटोसाठी जंगलात 6 दिवस ठाण मांडून बसला होता फोटोग्राफर

ब्लॅक पँथरचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हायरल फोटो कर्नाटकच्या काबिनी जंगलात काढण्यात आलेला आहे. या फोटोला फोटोग्राफर शाज जंगने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केल्यानंतर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी कमेंट्स करत हा फोटो ‘द जंगल बुक’ चित्रपटातील बघीरा या पात्राची आठवण करून देत आहे, असे म्हणत आहेत.

या फोटोविषयी शाज यांनी सांगितले की, मागील 5 वर्षांपासून दररोज 12 तास पँथरवर लक्ष ठेवत असे. मात्र पँथर जंगलात फिरताना स्वतःला झाडांमागे लपवत असे. या ब्लॅक पँथरने मला धैर्य शिकवले.

सोशल मीडियावर या ब्लॅक पँथरचा बिबट्यासोबतचा फोटो देखील व्हायरल होत आहे. या दोघांच्या फोटोविषयी त्यांनी सांगितले की, या सुंदर फोटोला काढण्यासाठी मला 6 दिवस जंगलात बसून वाट पाहावी लागली. या परफेक्ट फोटोसाठी खूप वाट बघावी लागली. हा फोटो देखील काबिनी जंगलातीलच असून, हिवाळ्यातील हा फोटो आहे.

या फोटोला मिथून फोटोग्राफी नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आले आहे. फोटो शेअर करत लिहिले की, क्लिओपेट्रा (बिबट्या) आणि साया (ब्लॅक पँथर) 4 वर्षांपासून या जंगलात राहत आहे. दोघांनाही एकत्र बघणे खास आहे. दोघांनाही एकत्र बघितल्यानंतर कोणतीही व्यक्ती आनंदाने वेडी होईल.