फेस आयडीने लॉक करता येईल फेसबूक मेसेंजर चॅट

लॉकडाऊनच्या काळात मुलांचा मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ऑनलाईन अभ्यासासाठी देखील मुले पालकांचा फोन वापरतात. अनेकदा मोबाईल वापरताना नको असलेल्या खाजगी गोष्टी मुलांच्या दृष्टीस पडतात. मुलांनी चॅटिंग पाहणे योग्य ठरत नाही. अशा स्थितीमध्ये तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फेसबुक मेसेंजरला फेस आयडीद्वारे देखील लॉक करू शकता.

मेसेंजरला फेस आयडीद्वारे लॉक करण्याचे फीचर सध्या केवळ आयफोन आणि आयपॅड युजर्ससाठीच आहे. फेसबुकने आपल्या या फीचरला अ‍ॅप लॉक नाव दिले आहे.

हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम फेसबुक मेसेंजर अ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. यानंतर तुम्हाला प्रायव्हेसी पर्यायावर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला अ‍ॅप लॉकचा पर्याय दिसेल.

अ‍ॅप लॉक पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारले जाईल की अ‍ॅपला कधी लॉक करायचे आहे. उदाहरणार्थ, 1. अ‍ॅपमधून बाहेर पडताच 2. दोन मिनिटांनंतर, 3. 15 मिनिट आणि 4. एक तासानंतर. तुम्ही तुमच्या सुविधेनुसार यातील पर्याय निवडू शकता. या आधी हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये देखील देण्यात आले होते.