तणावमुक्त होण्याचा उत्तम पर्याय; क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोनाग्रस्ताचे बासरीवादन

कोरोना व्हायरसने भारतातील स्थिती पुर्णपणे बदलून टाकली आहे. काही लोकांना या व्हायरसची भिती आहे, तर काहीजण नोकरी गमवल्याच्या चिंतेत आहेत. अनेकजण घरातच आहेत. कोरोनाची लागण झालेल्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले. यातच आसामच्या क्वारंटाईन सेंटरमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आसामच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये चिंता दूर करण्यासाठी बासरी वाजवी. मंत्रमुग्ध करणाऱ्या बासरीची धून ऐकूण इतर लोक देखील डान्स करू लागले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक रुग्ण शानदाररित्या बासरी वाजवत आहे. जे ऐकूण इतर लोक देखील बेडवरून उठतात व आसामचे पारंपारिक नृत्य करू लागतात. हा व्हिडीओ आसामच्या डिब्रूगढ येथील क्वारंटाईन सेंटरमधील आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत 26 हजारांपेक्षा अधिक जणांनी पाहिले आहे. अनेक युजर्सनी मानसिक तणाव कमी करण्यासाठी हा उत्तम उपाय असल्याचे देखील म्हटले.

Loading RSS Feed