चीनचा वचपा, अमेरिकेचे दूतावास बंद करण्याचे दिले आदेश

अमेरिकेने ह्युस्टन येथील चीनचे वाणिज्य दुतावास बंद करण्याचे आदेश दिले होते. आता यावर पलटवार करत चीनने देखील अमेरिकेचे चेंगूद येथील दूतावास बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली की, चीनने येथे स्थित अमेरिकन दूतावासाला या निर्णयाची माहिती दिली आहे व दूतावासाच्या स्थापनेचा आणि संचालनासाठी देण्यात आलेली परवानगी काढून घेण्यात आली आहे. चीनच्या या कारवाईमुळे आता दोन्ही देशांमधील संबंध अधिकच ताणले गेले आहेत.

हा निर्णय अमेरिकेने ह्यूस्टन येथील चीनचे दूतावास बंद करण्यास सांगितल्यानंतर, उत्तर देताना घेतला आहे. अमेरिकेने बुधवारी ह्यूस्टन येथील चीनी वाणिज्य दूतावास बंद करण्याचे आदेश दिले होते. मेरिकन बौद्धिक मालमत्ता आणि वैयक्तिक माहितीच्या संरक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अमेरिकेने म्हटले होते.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन या निर्णयावर म्हटले होते की, अमेरिकेच्या या निर्णयामागे दुर्भावनापूर्ण हेतू होता. त्यांच्या अधिकाऱ्यांनी मुत्सद्दी नियमाच्या पलीकडे कोणतीही कृती केली नाही. आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असून, यामुळे अमेरिका-चीनच्या नागरिकांमधील मैत्रीचा पुल तोडण्यासारखे आहे.