CEAT ने लाँच केला पंक्चर न होणारा टायर

CEAT इंडियाने दुचाकीसाठी पंक्चर सुरक्षित ट्यूबलेस टायर्सची एक नवीन रेंज लाँच केली आहे. कंपनीने Milaze रेंजचे हे नवीन टायर सीएटच्या पेटेंटेंड सीलेंट तंत्रासोबत येतात. जे पंक्चरला सील करतात व टायरला खराब होण्यापासून वाचवतात. कंपनीचे म्हणणे आहे की सीलेंट तंत्राला इन-हाऊस विकसित केले आहे व हवा बाहेर निघणार नाही अशाप्रकारे डिझाईन करण्यात आलेले आहे. 2.5 मिमीपर्यंत रुंद खिळ्याने पंक्चर झालेले टायर आपोआप व्यस्थित होतील.

Image Credited – NDTV

नवीन तंत्राबाबत सांगताना सीएट टायर्सचे मुख्य मार्केटिंग अधिकारी अमित तोलानी म्हणाले की, सीएट पंक्चर सुरक्षित टायर्स हे आमच्या ग्राहकांचा वेळ आणि उर्जा वाचविण्यासाठी आहे. टायरच्या या रेंजची विशेषता आपोआप दुरूस्त होणे ही आहे व आम्हाला वाटते की यामुळे अनेक ग्राहक याकडे आकर्षित होतील.

Image Credited – NDTV

सीएटचे हे नवीन टायर नक्कीच दुचाकीस्वाराला सुरक्षेच्या दृष्टीने उपयोगी ठरतील व टायर पंक्चर झाल्यामुळे होणाऱ्या संभावित घटनांना रोखेल. कंपनी एका सुरक्षित हेक्सागोनल बॉक्समध्ये नवीन पंक्चर सुरक्षित टायर देत आहे.

हे टायर 7 वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहेत. हे टायर रो ग्लॅमर, पॅशन प्रो i3S, स्प्लेंडर+, स्प्लेंडर आयस्मार्ट, होंडा शाइन आणि बजाज संपुर्ण रेंजमध्ये लागू शकतात.