राफेलमधील हॅमर क्षेपणास्त्रामुळे चीनचा उडणार थरकाप

मागील अनेक दिवसांपासून लडाखच्या एलएसीवर भारत-चीनमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. चीनला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारताने देखील पुर्ण तयारी केली आहे. सैन्यासह नौदल आणि हवाईदल देखील हाय अलर्ट मोडमध्ये आहे. भारताने चीनला स्पष्टपणे विवादित भागातून मागे हटण्यास सांगितले आहे.

चीनचा सामना करण्यासाठी हवाईदल प्रत्येक आघाडीवर पुढे राहण्याचा प्रयत्न करत आहे. रिपोर्टनुसार, हवाईदलाने अन्य एका घातक शस्त्राची ऑर्डर दिली आहे. हे शस्त्र म्हणजे हॅमर क्षेपणास्त्र हे आहे. हवेतून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र फ्रान्सकडूनच मागण्यात आली आहेत.

Image Credited – hindustantimes

भारताच्या आग्रहाखातर फ्रान्स हैमर हे घातक क्षेपणास्त्र लवकरच भारताला देणार आहे. राफेलमधून फायर झाल्यानंतर या क्षेपणास्त्राची मारक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढते. याचा निशाणा अचूक आहे. फ्रान्सला राफेलमध्ये हॅमर मिसाईल लावण्याचा आदेश देण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पुर्ण केली जात आहे.

Image Credited – India Today

हॅमर एक मध्यम श्रेणीतील एअर टू ग्राउंड क्षेपणास्त्र आहे. सुरूवातीला  राफेल लढाऊ विमानाला हॅमर क्षेपणास्त्राने सुसज्ज केले जाणार आहे. यामुळे लढाऊ विमानाची मारक क्षमता वाढेल. हे क्षेपणास्त्र 60-70 किमी सीमेत कोणत्याही प्रकारच्या लक्ष्यावर निशाणा साधण्यास सक्षम आहे. याला फ्रान्सच्या हवाई दल आणि नौदलासाठी तयार करण्यात आले होते.

Loading RSS Feed