आयडियाच्या पोस्टपेड प्लॅनचे नाव बदलले, आता असेल हे नाव

व्होडाफोन-आयडियाने आपल्या आयडिया पोस्टपेड प्लॅनचे नाव बदलले आहे. आयडिया पोस्टपेड प्लॅनचे नाव (निर्वाण) आता व्होडाफोन रेड करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून कंपनी यावर काम करत होती.

याआधी आयडियाच्या वेबसाईटवर गेल्यावर प्लॅन तपासल्यानंतर आयडियाची वेबसाईट उघडत असे. मात्र आता असे होत नाही. आता युजर्सने आयडियाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर कोणतेही पोस्टपेड प्लॅन चेक केल्यास साईट थेट व्होडाफोनच्या वेबसाईटवर रिडायरेक्ट होते. कंपनीने आयडियाच्या पोस्टपेड प्लॅनला देखील आता व्होडाफोन रेड नावाने जारी करण्यास सुरू केले आहे. व्होडाफोन-आयडियाने या संदर्भात फेब्रुवारीमध्ये माहिती दिली होती.

त्यामुळे अशी शक्यता आहे की कंपनी पुढे जाऊन आयडियाची साईट कायमस्वरूपी बंद करेल व प्री-पेड प्लॅनला देखील व्होडाफोनच्या नावाने जारी करण्यात आले आहे. आयडिया निर्वाण पोस्टपेड प्लॅनचे नामकरण मुंबई, गुजरात, बिहार, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणामध्ये सुरू आहे.

दरम्यान, व्होडाफोन-आयडियाने काही दिवसांपुर्वीच ई-सिम सादर केले आहे, जे सध्या आयफोन युजर्ससाठी उपलब्ध आहे. व्होडाफोन-आयडियाच्या आधी एअरटेल, जिओ ई-सिमची सुविधा देत आहेत.