जाणून घ्या कधी, कोठे व कोणत्या वेळी रिलीज होणार सुशांतचा शेवटचा चित्रपट

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला 1 महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला असला तरीही त्याचे चाहते अद्याप या धक्क्यातून सावरलेले नाहीत. सुशांतच्या आठवणीत व त्याला ट्रिब्यूट देत त्याचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’ रिलीज केला जाणार आहे. हा चित्रपट कधी व कोठे रिलीज होणार आहे, याविषयी संपुर्ण माहिती जाणून घेऊया.

सुशांतचा अखेरचा चित्रपट 24 जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी+ हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे डायरेक्टर मुकेश छाबडाने चित्रपटाच्या प्रिमियरच्या वेळेची माहिती दिली आहे. दिल बेचारा 24 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजता स्ट्रीम होईल. सर्वसाधारणपणे ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट अथवा सीरिज आदल्या रात्री 12 वाजता रिलीज होत असते. मात्र सुशांतच्या चित्रपटासोबत असे होणार नाही.

इंस्टाग्रामवर मुकेश छाबडाने या संदर्भात माहिती देत सांगितले की, या चित्रपटाचा प्रिमियम वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी होईल. दिल बेचारा भारतात डिज्नी हॉटस्टार आणि अमेरिका, ब्रिटन, कॅनडामध्ये हॉटस्टारवर भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता स्ट्रीम होईल. खास गोष्ट म्हणजे हा चित्रपट पाहण्यासाठी स्बस्क्रिप्शनची देखील गरज नाही.

दिल बेचारामध्ये सुशांतसोबत अभिनेत्री संजना संघी दिसेल. म्यूझिक एआर रेहमानने दिले आहे. हा चित्रपट हॉलिवूडच्या द फॉल्ट इन ऑर स्टार्सचा हिंदी रिमेक आहे.